पो. नि. अश्वनाथ खेडकर कर्तव्यदक्ष व संजय गांधी समाजसेवक पुरस्काराने सन्मानित.

पोलीस प्रवाह न्यूज.

रायगड: दि. २५ -  पोलीस प्रवाह तर्फे माणगांव तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर तर  संजय गांधी यांना समाजसेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्कार समारंभ दि. २५ ऑक्टोबर रोजी माणगांव पोलीस ठाणे येथे पार पडला. यावेळी सहा. पो. नि. वराळे, सहा. पो. उप. नि. जितेंद्र वाटवे, मगर, पो. ह. पाटील, म. पो. ना. धनावडे, पो. ना. खिरीट, पो. शि. रामनाथ डोईफोडे, शाम शिंदे, गीते, म. पो. शि. मोरे, वझरकर, जेष्ठ पत्रकार अरुण पवार, मा. ता. पत्रकार संघाचे अध्यक्ष रविंद्र कुवेसकर, पोलीस प्रवाह वृत्त संपादक परेश शिंदे, पत्रकार गिरिश गोरेगावकर,  निरंजन कळस, सुनील राजभर, वैभव सत्वे, नचिकेत म्हापसेकर, अमित जाधव, निलेश थोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रवाह दिवाळी अंक खाकी पर्व २ चे प्रकाशन ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 


माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्कारमूर्ती अश्वनाथ खेडकर  यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आमच्या पोलिसांच्या कामाची दखल घेऊन पोलीस प्रवाहाने केलेल्या सत्कारामुळे आम्हाला स्फूर्ती मिळते. तसेच हा सत्कार माझा एकट्याचा नसून आम्हा सर्व पोलिसांचा सत्कार आहे. 

सत्कारमूर्ती  संजय गांधी यांनी विदुयत पर्यवेक्षक  व समाजसेवक म्हणून माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड या तालुक्यात कोरोना काळात शासकीय  कार्यालयात कसलीही भीती व तमा न बाळगता अहोरात्र सेवा देऊन शासकीय कार्यालयात वीज पुरवठा खंडित होऊ दिला नाही. याबद्दल संजय गांधी यांना समाजसेवक या पुरस्काराने पो. नि. अश्वनाथ खेडकर, जेष्ठ पत्रकार अरुण पवार व रविंद्र कुवेसकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या