कोल्हापुर प्रतिनिधी -
आपला देशाची कृषिप्रधान देश म्हणुन ओळख आहे.कृषीप्रधान संस्कृती असल्याने शेतकरी हेच देशाचे महत्त्वपुर्ण अंग आहे.गणेशोत्समध्ये म्हाकवे ता.कागल येथील अमित पाटील यांनी आपल्या घरी आरास आणि देखावा करणेसाठी बळीराजाच्या प्रती कृतज्ञा म्हणून हा देखावा केला असुन जुन्या काळातील पारंपरिक शेती बैलांच्या साहाय्याने कशी केली जात होती हे दाखविले आहे.
जुन्या काळामधील मोटेच्या आणि बैल जोडीच्या साहाय्याने शेतीला पाणी देण्याची पद्धत दाखवली आहे.खळ्यावरील तीवड्याच्या साहाय्याने होणारी मळणी,शेताची मशागत करणारा शेतकरी आणि धाण्यांची पोती बैलगाडीने नेणारा शेतकरी दाखवला असुन नवीन पिढीला हा ठेवा माहीत व्हावा हा उद्देश हा देखावा केला असल्याचे ते बोलले.
वडाच्या झाडाखाली विराजमान बाप्पा आणि त्याच्या आशीर्वादाने बळीराजाची चाललेली काळ्या आईची सेवा असा हा देखावा लक्ष वेधुन घेतो आहे.स्वतः म्हाकवे गावचे पोलीस पाटील असलेले अमित पाटील यांना त्यांचे पुतणे योगेश,सुयश पाटील व कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळाले.


0 टिप्पण्या