पोलीस प्रवाह न्यूज.
संगमेश्वर : दि. ९ - धामापूर जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभाग प्रमुख अध्यक्षपदी श्री. महेश बाष्टे यांची मा.आमदार शेखर निकम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नवनियुक्ती करण्यात आली. श्री. महेश बाष्टे हे सामजिक कार्यामध्ये नेहमी तत्पर असतात त्या मध्ये त्यांनी रक्तदान शिबिरात योगदान , संत गाडगेबाबा स्वच्छ अभियान मध्ये माखजन ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळून देण्यात ही त्यांचं योगदान आहे, भ्रष्टाचार विरुद्धही त्यांनी देवरूख पंचायत समिती समोर दोन दिवसांचे उपोषण त्यांनी केले होते. यांच्या या संपूर्ण कारकिर्दीला पाहता धामापूर जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभाग प्रमुख अध्यक्षपदी श्री. महेश बाष्टे यांची मा.आमदार शेखर निकम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नवनियुक्ती करण्यात आली.त्यांचे अभिनंदन तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



0 टिप्पण्या