वर्दीतील माणुसकी :- वाढदिवसाचे औचित्य साधून पोलीस हवालदार विनायक औताडे यांनी जपली सामाजिक बांधिलकी..
वाढदिवस म्हटले की पार्टी व इतर खर्चासाठी अनेकजन पैसे तुफान खर्च करत असतात. त्यामध्ये सरकारी सेवक असो या खाजगी सेवक पण याला अपवाद कागल पोलीस स्टेशन मधील पोलीस हवलदार विनायक औताडे हे आहेत.
कारणही तसेच आहे.हवालदार विनायक औताडे यांचा दि.23 आँगस्ट रोजी वाढदिवस होता.वाढदिवसाच्या अवाढवी खर्चाला मुठमाती देऊन विनायक औताडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रेरणादायी कार्य केले आहे.जेणेकरून अनेक मंडळींनी घेण्यासारखे आहे.
आपल्या वाढदिवसा निमित्त पोलीस हवलदार विनायक औताडे यांनी मत्तिवडे ता.निपाणी येथील भारतीय समाज सेवा निराधार आश्रमातील निराधार नागरिकांना दोन वेळा पुरेल एवढे भोजन दान केले.इतकेच नाही तर स्वतः पोलीस कर्मचारी असुन देखील पंक्तीत बसलेल्या त्या निराधार नागरिकांना भोजन वाटप केले.
ते इतक्यावरच थांबले नसून आश्रमचालक अमर पवार यांचे निराधार आश्रमाचे कार्य पाहून रोख रक्कम पाच हजार रुपये खर्चासाठी काढून दिले..या केलेल्या मदतीबद्दल अमर पवार यांनी पोलीस हवलदार विनायक औताडे यांचे आभार मानले.
वाढदिवसाच्या खर्चाला मुठ माती देऊन केलेले सामाजिक कार्य हे खरच प्रेरणादायी असुन याचा बोध इतरांनी घेण्यासारखा आहे.
प्रारंभी हवलदार विनायक औताडे यांनी निराधार नागरिकांच्या समवेत केक कापून आश्रमात वाढदिवस साजरा केला.त्यांचा सत्कार येथील नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.तर त्यांचे औक्षण आश्रम संचालिका शुभांगी पवार यांनी केले..
याप्रसंगी हवालदार रणजित कांबळे, सचिन कांबळे ,सुरज कांबळे, अनंत कोंडरे ,आदी पोलीस कर्मचारी व मित्रपरिवार उपस्थित होते



0 टिप्पण्या