पोलीस प्रवाह न्युजचा रक्षाबंधन उपक्रम आनंद देणारा. मा.श्री दत्तात्रय नाळे (पोलीस निरीक्षक कागल)


 ✒️कोल्हापुर प्रतिनिधी ; विनायक सातुसे


हिंदु संस्कृतीतील महत्वाचा मानला जाणारा रक्षाबंधन हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.बहीण भावाच्या प्रेमाचा अतुट नात्याचा हा सण साजरा करताना पोलीस प्रशासन मात्र पोलीस ठाण्यामध्ये अखंड सेवा देत असतात.त्यांना ह्या रक्षाबंधनाच्या सणामध्ये सहभागी होता येत नाही.अश्या परिस्थिती मध्ये पोलीस प्रवाह न्युज चे संपादक नवनाथ कापले सर यांच्या संकल्पनेतुन पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रक्षाबंधन साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतला गेला.हा उपक्रम खुप कौतुकास्पद असुन पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामाच्या व्यापातून सण आणि उत्सव साजरे करता येत नसतात.पण पोलीस प्रवाह न्युज कोल्हापूर यांनी पोलीस ठाण्यामध्ये येऊन केला केलेला रक्षाबंधन उपक्रम आनंद देणारा होता.त्यातुन एक ऊर्जा मिळाली असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.



पुण्यातील दृष्टीहीन बांधवांनी बनवलेली राखी मनगटावर बांधताना पोलीस बांधव आनंदी आणि प्रसन्न झाले होते.तर काही महिला पोलीस देखील आजच्या दिवशी परिवारासोबत राखी पौर्णिमा साजरी न करता आल्याची खंत करत असताना पोलीस प्रवाह न्युजच्या वतीने मिळालेली राखी बांधताना भारावुन गेल्या होता.त्यांनी ह्या उपक्रमाचे खुप कौतुक केले.



हुपरी पोलीस ठाण्याचे सहा.फौजदार हजारे,कागल चे राजीव सावंत,राम डावरे इत्यादी उपस्थित होते.


सदर उपक्रमासाठी जिल्हा प्रमुख विवेक पोतदार जिल्हा पत्रकार प्रतिनिधी विनायक सातुसे कागल तालुका प्रमुख नितेश पोतदार,माधुरी वाडकर,सायली पाटील इत्यादी अधिक मोलाचे सहकार्य लाभले.

🚨Police Pravah News🚨

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या