उपभोक्ता संरक्षण परिषदेच्या मीडिया हेड ऑफ पुणे जिल्हा पदी सागर पवार यांची नियुक्ती.

पोलीस प्रवाह न्यूज पुणे 

पुणे : दि. ७. -भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त उपभोक्ता संरक्षण परिषदेच्या पुणे जिल्हा मीडिया हेड पदी सागर राजेंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सागर पवार हे पिंपरी चिंचवड येथील असून गेली अनेक वर्षे पत्रकारीत काम करीत आहेत. 

एकेकाळी ग्राहक हा बाजारपेठेचा राजा समजला जात होता. परंतु आज सर्वच बाजूने त्याची पिळवणूक होताना दिसत आहे.  ग्राहकांच्या फसवणुकीच्या तक्रारी भरमसाठ प्रमाणात वाढ होत आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी  व ग्राहकांनी वेळोवेळी सतर्क राहण्याच्या जनजागृतीच्या कार्याला सागर पवार हे नक्कीच मीडियाद्वारे वाचा फोडतील यामुळे ग्राहकांचा नक्कीच फायदा होऊन फसवणुकीच्या घटनांना  आळा बसेल.  

सागर राजेंद्र पवार हे अनेक वर्ष मीडियामध्ये सक्रिय असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक वृत्तवाहिनी दैनंदिन पेपर व साप्ताहिक मध्ये आपले कौशल्य पणाला लावून आपल्या कार्याचे दाखले दिलेले आहेत.सागर पवार यांच्या माध्यमातून ग्राहक जनजागृतीचे कार्य  केले जाईल. 

ग्राहकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवून ग्राहकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या ग्राहक संरक्षण परिषदेने सागर पवार यांची नेमणूक केली आहे.  सागर पवार यांनी गेली अनेक वर्षे आपल्या लेखणीतून पुणे जिल्ह्यात एक वेगळा ठसा उमटविला आहे. अनेक शासकीय योजना गोरगरिबांपर्यत पोहचविण्याचा प्रयन्त केला असून एक सक्रिय पत्रकार म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यात ओळख आहे. ही नेमणूक राष्ट्रीय सचिव अरविंद धुळेकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील ढमाल यांनी नियुक्ती पत्र सागर पवार यांनी देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या