प्रतिनिधी - करमाळा
कोरोना महमारी ला आज वर्ष होत आहे ,त्याचसोबत कलाकारांचे कार्यक्रम बंद होऊन हि वर्ष झाले या वर्षभरात कित्येक कलाकारांनी आत्महत्या केल्या कित्येक कलाकाराना उपासमारीने जीव गमवावा लागला ,मात्र सरकार ने यासाठी ठोस पावले न उचलता या वर्षी सुद्धा कार्यक्रमांना बंदी घातल्याने कलाकारांनी जगायचे कसे कुटुंब चालवायचे कसे ,असे अनेक प्रश्न निर्माण झालेत ,हॉटेल रिसॉर्ट इव्हेंट कंपनी ,मंडप डेकोरेटर केटर्स ,मंगल कार्यलय, यांचेसह
सर्व स्तरातील कलाकार मग ते लोककलावंत ,चित्रपट ,नाटक कलावंत बँड ,बेंजो ,ऑर्केस्ट्रा वाले ,तमाशा , सर्वच छोटे मोठे कलाकार यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालेय ,माझा राज्य सरकारला प्रश्न आहे ,मागील सप्टेंबर नंतर कोरोना संसर्ग सुरु असताना सुद्धा महाराष्ट्रात निवडणूका मोठ्या धामधुमीत चालू होत्या हाजारो लोकांची गर्दी ,होत होती ,मोठ्या मोठया सभा ,गाजत होत्या , राजकीय नेत्यांचे मुलांची लग्न मोठ्या थाटात होती हाजारो वर्हाडी,सह सर्व नेते मंडळी विना मास्क हजेरी लावत होते , तेव्हा सर्व काही आलबेल होते तेव्हा मात्र कोणावर कार्यवाही करु शकले नाही , आज मात्र सामान्यांचे लग्नात शंभर दोनशे लोक दिसली की कार्यवाही हा दुजाभाव करून काय साध्य झाले ,आज यात्रा उस्तव सुरु नाहीत ,त्यामुळे ,तमाशा ,लावणी कलाकार याना उपासमारी ची वेळ आलीय,दोनशे ते अडीचशे लोकांना लग्नासाठी परवानगी मिळाली तर सर्व कलाकारांची काम सुरु होतील कोरोना चे नियम पाळत नक्की लोकांचे लग्न सोहळे पार पडतील मंगल कार्यलयात योग्य नियम पाळले जातील याची आम्हाला खात्रि आहे ,त्यामुळे राज्यसरकार ने काही नियम अटिंसह लग्न सोहळे मनोरंजन चे कार्यक्रम याना परवानगी दयावी जेणेकरून या गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या सर्वाना काम मिळेल, रोजगार मिळेल ,कलाकारांना पण काम मिळेल
कलाकार हा गेल्या वार्षिपासून आजपर्यँत शांततेने सर्व गोष्टी सहन करतो आहे ,मात्र पुन्हा कार्यक्रमांना बंदी घालून मागचे दिवस पुढे येणार असतील तर महाराष्ट्रतील लाखो कलाकार गप्प बसणार नाहीत ,मोठी आंदोलने केली जातील ,कलाकाराचे संयमाचा अंत झालाय त्यामुळे येथून पुढे राज्यात ला कलाकार हा रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही


0 टिप्पण्या