रायगड : दि. ३१. माणगांव तालुक्यातील मौजे अंबर्ले येथील सुरेश उभारे हे १९८१ साली भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून कार्यरत झाले. त्यांनी १७ वर्ष देशसेवा केली. त्यानंतर १९९६ साली ते भारतीय सैन्य दलातून नाईक म्हणून आपली सेवा प्रामाणिकपणे पूर्ण करून नाईक या पदावरून सेवानिवृत्त होऊन बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये १९९६ साली ते दप्तरी या पदावर कार्यरत झाले. या कालावधीत सुरेश उभारे यांनी बँक मध्ये येणारी एखादी लहान व्यक्ति असो किंवा जेष्ठ नागरिक असो सर्वांना मनमोकळेपणाने मदत करून मोठ्या मनाने सहकार्य करत असत. त्यामुळे बँक मध्ये येणारी प्रत्येक व्यक्ति ही काका ना विचारपूस केल्या शिवाय जात नाही.
अशा प्रकारे आपली प्रामाणिकपणे सेवा करून आज दि. ३१ मार्च रोजी माणगांव शाखेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मधून सुरेश उभारे सेवा निवृत्त झाले. यावेळी सौ.उभारे, बँक ऑफ महाराष्ट्र माणगांव शाखेचे शाखा अधिकारी अमित मैत्रा, विशेष अधिकारी राजेंद्र घाडगे, हेड कॅशियर रिहाना शेख, क्लार्क धनंजय भाटे, शिपाई रुपेश नाक्ती, निजामपूर शाखा अधिकारी राजकिशोर शर्मा, भिरा शाखा अधिकारी श्रेयस बर्वे तसेच माणगावकर नागरिक उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी बँकेचे शाखा प्रबंधक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मोकळेपणा व पुढाकाराने काम करणारे काका म्हणजे आमचे उभारे काका. गेली ८ वर्ष अगदी प्रामाणिकपणे आणि सुज्ञ असो किंवा अडाणी अशा ग्राहकांना काका अगदी नम्रपणे सहकार्य करून अल्पावधीत माणगांव शाखेला नावारूपाला व एक वेगळी ओळख निर्माण करुन देण्यामध्ये काकांचा सिहांचा वाटा असून २४ तास चालणारा सर्व्हर म्हणजे आमचे उभारे काका. अशा प्रकारे माजी सैनिक सुरेश उभारे यांची बँकेतील सेवा पूर्ण होऊन निरोप समारंभ संपन्न झाला.





0 टिप्पण्या