सिद्धनेर्ली परिसरात उच्च दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे लाखोंचे नुकसान
सिद्धनेर्ली ता.कागल येथे असणाऱ्या विद्युत उपकेंद्रातून दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३ ते ३.३० च्या दरम्यान सिध्दनेर्ली उपकेंद्रातून ज्यादा प्रमाणात ( उच्च दाबाने) विद्युत पुरवठा झालेनेमोठे नुकसान झाले त्याचबरोबर नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले होते.
सदर सिद्धनेर्ली नदीकिनारा येथील अनेक व्यावसायिक दुकानात मोठे नुकसान झाले असुन कुठच्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सिध्दनेर्ली नदीकिनारा येथील सतीश निकम यांचे महा.इ सेवा केंद्रातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे,धैर्यशील पाटिल, मारुती आगळे,नागेश मगदूम,दिपक केर्ले यांचे दुकानातील टी व्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले आहे त्याची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी निवेदन देण्यात आले.ह्यावेळी शाखा अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या