पोलीस प्रवाह न्युज
रायगड : दि. ८ - माणगाव क्रिकेट असोसिएशन यांच्या सौजन्याने श्री सोन भैरव क्रिकेट क्लब खांदाड संघाने रविवार दि. ०७ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत ए वन ग्रीन लोणशी संघाने प्रथम क्रमांकचे रोख पारितोषिक १००००/- रुपये व आकर्षक चषक पटकाविला. या स्पर्धेत असोसिएशनचे १६ संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील तीनबत्ती नाका संघाच्या मैदानावर श्री सोन भैरव क्रिकेट क्लब खांदाड संघाने स्पर्धेचे उत्तम पद्धतीने आयोजन केले होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे विजेते यजमान संघ श्री सोन भैरव क्रिकेट क्लब खांदाड संघास रोख ७०००/- रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते संयोग क्रिकेट संघ साईनगर संघास रोख ५०००/- रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकाचे विजेते जय हनुमान क्रिकेट क्लब उतेखोलवाडी माणगाव संघास रोख ३०००/- रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून ए वन ग्रीन लोणशी संघाचा खेळाडू रियान, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ए वन ग्रीन लोणशी संघाचाच मन्नान पालेकर तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा मालिकावीराचा बहुमान श्री सोन भैरव क्रिकेट क्लब खांदाड संघाचा रोशन पोवार यांनी पटकावला. स्पर्धेचे सर्व पारितोषिके मा.श्री. ज्ञानदेवजी पवार रा. जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती यांच्या मार्फत देण्यात आली होती. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस समारंभाला माजी शिक्षण व आरोग्य सभापती रा.जि.प. ज्ञानदेव पवार, खांदाड गावचे अध्यक्ष काशीराम पोवार, उपाध्यक्ष अनंत पोवार, पोलिस पाटील नथुराम पोवार, उद्योजक मारुती बोंबले, माहमूद धुंदवारे, असोसिएशनचे अध्यक्ष फहद करबेलकर आदी मान्यवरांसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य व स्पर्धक उपस्थित होते.



0 टिप्पण्या