प्रतिनिधी - आकुर्डी
दिनांक ०९/०२/२०२१ रोजी दत्तवाडी येथील महिलांनी सामाजिक कार्यकर्ते योगेश भागवत यांच्या निवासस्थानी बैठक घेतली .
बैठकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली व नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या कडे त्यांच्या समस्या म्हणजे महिलांच्या सुरक्षा, रोजगार , प्रभागातील कामे, वाढती गुन्हेगारी, या समस्या मांडल्या .
प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक मा.प्रमोद कुटे यांनी काहीच दिवसांत तुमच्या समस्या दूर करतो व गरजू महिलांना रोजगाराचे आश्वासन दिले तसेच महिलांच्या सुरक्षिते साठी सी सी टि व्ही लावू व महिलांना ञास झाल्यास पोलिस अधिकाऱ्यांन सोबत कायदेशीर कार्यवाही करु असे ठोस आश्वासन महिलांना दिले . ( त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मा.योगेश भागवत यांच्या प्रयत्नांना यश येणार आहे )



0 टिप्पण्या