रायगड : दि. २१- रायगड जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त माणगाव वाहतूक शाखे ने 32 वे रस्ता सुरक्षा अभियान 2021 अंतर्गत “सडक सुरक्षा जीवन रक्षा" बद्दल वाहनचालकांना मार्गदर्शन केले.
दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा. तसेच चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करावा. वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात वाहन चालवू नये मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. वाहन चालवताना लेन कटिंग करू नये, पादचाऱ्यांनी नेहमी फूटपाथचा वापर करावा वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये रस्त्यावरती धोकादायकरित्या वाहन चालवू नये, पादचार्यानी झेब्रा क्रॉसिंग ठिकाणी रस्ता ओलांडावा. वाहन चालवताना पादचारीना प्राधान्य द्यावे. असे माणगाव पोलीसांनी नियमांचे मार्गदर्शन केले.
या वेळी माणगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक कावळे, पोलीस उपनिरिक्षक करे, वाहतूक शाखेचे लालासाहेब वाघमोडे, रावसाहेब कोळेकर व इतर पोलीस कर्मचारी यांचे हस्ते वाहनांना रिफ्लेक्टर लावणेत आले. तसेच वाहतुकीच्या नियमांचे वाहन चालकांनी काटेकोर पणे पालन करावे या बद्दल वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.तसेच मुंबई गोवा महामार्गावर जागो जागी नियमाचे फलक लावण्यात आले आहेत.तरी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखे तर्फे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी जिल्हयातील नागरिकांना केले आहे.




0 टिप्पण्या