पोलीस प्रवाह न्यूज़
रायगड : दि. १८ - माणगांव तालुक्यातील झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत महत्वाची समजल्या जाणाऱ्या बामणोली ग्रामपंचायतीचा निकाल दि. १८ जानेवारी रोजी लागला.
बामणाेली ग्रामपंचायतीत ९ जागांपैकी ५ सदस्य बिनविराेध देण्यात आले हाेते. दि. १५ जानेवारी रोजी उर्वरीत जागांकरीता नेत्रुत्व सिद्ध करण्यासाठी ४ जागांवर निवडणुक घेण्यात आली. ग्रामपंचायत मधील निवडणूक मोठी चुरशीची झाली. या निवडणुकीत प्रभाग क्र. १मधून भारत राम पवार, प्रभाग क्र. ३ मधून सुशांत बाळाराम पडवळ, प्रभाग क्र. २ मधून उज्वला शैलेश पाखुर्डे व स्वाती संदेश पाखुर्डे हे महाविकास आघाडीचे ४ ही उमेदवार विजयी झाले.
माणगांव तालुक्यात बामणाेली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांनी विजयाचे श्रेय स्वत:कडे न घेता सर्व मतदार व ग्रामस्थांचे आभार व अभिनंदन केले आहे. येत्या काळात सर्वाना सोबत घेऊन ग्राम पंचायत मार्फत लोकहिताची कामे करण्यावर जास्त भर असेल व बामणाेली ग्रामपंचायत तालुक्यात विकासकामे करण्याबाबत अव्वल असेल असे विजयी उमेदवार भारत पवार यांनी बोलताना सांगितले.



0 टिप्पण्या