*पिंपरी चिंचवड मध्ये रोप स्किपिंग कार्यशाळेचे आयोजन*
माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळ पिंपरी चिंचवड शहर ,महाराष्ट्र रोप स्किपिंग असोसिएशन, पुणे रोप स्किपिंग असोसिएशन व पिंपरी-चिंचवड रोप स्किपिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड येथे दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी एस एन बीपी स्कूल मोरवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेची सकाळी नऊ वाजता सुरवात झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून संदीप गाडे महाराष्ट्र सचिव रोप स्कीपिंग असोसिएशन व गणेश राऊत अध्यक्ष शारीरिक शिक्षण महामंडळ पुणे जिल्हा यांच्या शुभहस्ते झाले.कार्यशाळेसाठी पुणे जिल्ह्यातून गणेश वरकड खेड तालुका, सदाशिव सावंत इंदापूर तालुका, महादेव माळी मावळ तालुका, भाऊसाहेब पुणे पुरंदर, संजय खराडे जुन्नर, गोरखनाथ काकडे मावळे आणि प्रफुल कुमार बनसोडे पुणे शहर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच पिंपरी-चिंचवड शारीरिक शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख ,समन्वयक निवृत्ती काळभोर, सचिव महादेव फपाळ तसेच पिंपरी चिंचवड रोपे स्किपिंग संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता कांबळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब हेगडे व खजिनदार अभिजीत गव्हाळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या साठे यांनी केले.
कार्यशाळेकरिता पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुका येथून एकूण 105 क्रीडाशिक्षक उपस्थित होते कार्यशाळेमध्ये रोप कीपिंग खेळाबद्दल ग्राऊंडच्या मोजमापा पासून ते खेळाच्या सर्व नियमांची माहिती थेराॕटिकली व प्रात्यक्षिक रूपात देण्यात आली
शेवटी कार्यशाळेची सांगता आभार प्रदर्शनाने झाले तर आभार बाळासाहेब हेगडे यांनी मानले.





0 टिप्पण्या