मराठा उद्योजक लॉबी आयोजित राज्यव्यापी महारक्तदान सोहळ्यास प्रचंड प्रतिसाद...

 


संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुकास्तरावर एकूण २७ ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये हजारो बांधवांनी रक्तदान केले.


*संस्थापक श्री. विनोदभाऊ बढे, कार्याध्यक्ष स्वप्नीलभाऊ काळे व कोअर कमिटीच्या निर्णयानुसार पुणे ॲडमीन श्री. केडी उर्फ कुलदीप पाटीलसर* यांनी जिल्ह्यात २ ठिकाणी पुणे शहरामध्ये हडपसरला व ग्रामीणमध्ये मंचर, आंबेगाव येथे रक्तदान शिबीराचे नियोजन करण्यात आले.

पुणे शहर व जिल्हा येथे अवघ्या दोनच दिवसाच्या तयारीनंतर 78+ बॕग रक्त संकलित करण्यात आले. 

अनेक विघ्न आली ऐनवेळी दगा झाला असो परंतु जेव्हा *छत्रपती शिवराय असे शक्तीदाता* तेव्हातर संकटे पण आव्हान वाटू लागतात आणि लढून त्या आव्हानांना परतवून लावायची प्रेरणा मिळते.

या यशामागे खरंतर अनेकांचे अमूल्य योगदान व प्रचंड मेहनत आहे. सर्व बंधू-भगिनींच्या अथक प्रयत्नांचे, खंबीर साथीचे आणि एकनिष्ठ एकजुटीचे हे प्रतीक आहे.

या नियोजनात प्रामुख्याने भावासारखा कायम पाठीशी उभा राहणारा चिंतेश्वरभाऊ देवरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री. उदयभाऊ भक्ते व श्री वैभवभाऊ फरतडे, MUL पुणे टीम (शहर व ग्रामीण), MUL मिडीया, कॕल्सी  उद्योगसमूहाच्या कल्याणीताई, नोबेल हॉस्पिटलचे वाळूंजसर, मंचर मधील विनोदभाऊ  तसेच

सिटी हॉस्पिटल, मंचर. कॕल्सी_उद्योगसमूह, पुणे

AR Labdor, पुणे

MUL आंबेगाव टीम,

पुणे ब्लड बँक टीम 

यातील सर्व कर्मचारीवर्गाच्या मेहनतीचे फळ आहे.

हे यश असेच अबाधित राहो हीच आईभवानी चरणी प्रार्थना 🙏

तसेच संपुर्ण महाराष्ट्र टीम MUL चे मनापासून अभिनंदन आणि रक्तदात्यांचे शतशः आभार..!

आपलाच बांधव,

*केडी उर्फ कुलदीप पाटीलसर*

_*ॲडमीन - पुणे शहर व पुणे जिल्हा*_

व्हाॕटसॲप *८३२९६४६७६४*

*#देऊ उभारी...*

*#घेऊ भरारी....✌🏻*

*मराठा उद्योजक लॉबी परिवार🚩*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या