▪️ *महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघ यांंची मा.ना.सुनिल केदार साहेब*- मंञी क्रीडा व युवक कल्याण , 🚨 महाराष्ट्र राज्य यांचे कडे करण्यात आली, 🤾♀️🏃♀️🚴♂️🥇🏆
पुणे. - शिवछञपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे मा. केदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम -२०२० संदर्भात चर्चासञ आयोजित करण्यात आली होती. यावेळी *पुणे जिल्हा* युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे *श्री . गणेश जोरवर-पाटील ,श्री. विजय बामुगडे (उपाध्यक्ष , पुणे युवा जिल्हा ), युवा महासंघाचे मार्गदर्शक मा.डाँ.रणजित चामले सर, श्री . पप्पू यादव , श्री. राकेश यादव , श्री .संदीप भगत ,श्री .किरण पाटील ,श्री .अजित कंकाळ , श्री .निखिल सातव , श्री .अक्षय सालेकर* आदी *पदाधिकारी तसेच जिल्हा संघटक* निवेदन देऊन सदरची मागणी करण्यात आली.
सर्व प्रथम महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्र आणि खेळाडू , क्रीडा शिक्षक संघटना यांच्या वतीने अभिनंदन !!! 💐🌹👏करण्यात आले.
देशातील *पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ* आपल्या महाराष्ट्र राज्यात स्थापन होत आहे . आणि *देशाला पहिले आँलिम्पिंक पदक मिळवून देणारे स्व.खाशाबा जाधव* हे देखील पहिले महाराष्ट्राचे *सुपुञ* आहेत.आणि हे क्रीडा विद्यापीठ देखील महाराष्ट्रात होत आहे, स्व. खाशाबा जाधव यांनी कुस्ती मधून १९५३ च्या आँलिम्पिंक मधे कांस्य पदक मिळवून देशाचा *नावलौकिक वाढवला* आहे . वरील खास उल्लेखनीय कामगिरीचा *गौरव* म्हणून, तमाम *देशाला, राज्याला प्रेरणा स्थान* 🇮🇳🇮🇳 म्हणून पुणे येथे स्थापन होणारे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठास खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात यावे.असे तमाम महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक , खेळाडू यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे, असे निवेदन देण्यात आले, 🙏
*मार्गदर्शन :-*
▪️ *मा.श्री.संदीप मनोरे सर (महाराष्ट्र राज्य )*
▪️ *मा.श्री.तायप्पा शेंडगे सर (महाराष्ट्र राज्य )*
▪️ *डॉ.मिलींद जाधव सर ( अध्यक्ष- पुणे जिल्हा)*
▪️ *श्री.रोहित इंगवले सर (सचिव - पुणे जिल्हा)*
*@महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक महासंघ*🤾♀️🏃♀️🚴♂️🥇🏆🙏




0 टिप्पण्या