नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रभाग क्र. १६ मधुन आबा दळवी अपक्ष उमेदवार रिंगणात उतरणार.

पोलीस प्रवाह न्यूज़

रायगड : दि. २७ - माणगांव शहरातील खांदाड येथील रहिवासी चारुदत्त राजाराम दळवी उर्फ आबा दळवी या नावाने संपूर्ण माणगांव शहरासह तालुक्यात प्रख्यात असणारे आबा माणगांव नगरपंचायत निवडणूक लढवणार आहेत.  

या आधी २६ वर्षांपूर्वी १९९४ मध्ये माणगांव ग्रामपंचायत असताना आबा यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आंबा ह्या निशाणीवर अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्या वेळेच्या दिग्गजांना अक्षरशः त्यांनी घाम फोडला होता. अल्पशा मताने त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला. त्यांची खांदाडमध्ये ही तिसरी पिढी आहे. आता मात्र वयाच्या ५९ व्या वर्षी सुद्धा ते त्याच नव्या जोमाने, ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ही निवडणूक मी नक्कीच जिंकेन असा आत्मविश्वास ही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

आबा पुढे म्हणाले की, १९९४ ची निवडणूक एकही पैसा खर्च न करता फक्त नागरिकांच्या विश्वासावर लढवली होती. तोच जनतेचा असणारा माझ्या बद्दलचा विश्वास आणि प्रेम या जोरावरच आगामी येणारी नगरपंचायत निवडणूक अपक्ष लढवून जिंकूनच येईन असे सांगितले. तसेच मुळातच समाजसेवेची आवड व स्वतः वास्तव्यास असणारा प्रभाग क्र. १६ मधील बहुसंख्य मतदार व ॐ कार भजनी मंडळातील कार्यकर्ते व सभासद यांचा पाठींबा याचा फायदा ही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. होणाऱ्या निवडणुकीत पैसा, मद्य व अन्य प्रकारची लालच व खोटे आश्वासन देऊन मतदार राजाला फसवून मत मागून एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा त्या वार्डात न फिरकणे हा माणगांवच्या राजकारणाचा भाग बनलेला आहे. सूज्ञ मतदारांना मी आवाहन करतो की कोणत्याही अमिषाला व भूलथापांना बळी जाऊन आपलं अमूल्य मत वाया घालवू नका. आपापल्या विभागातील योग्य उमेदवाराला निवडणून द्या असे मत आबा दळवी यांनी व्यक्य केले. मी एक आझाद शत्रू आहे त्यामुळे निवडणुकीत नक्कीच यश संपादन करीन.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या