पोलीस प्रवाह न्यूज़
रायगड : दि. ३- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटस यांच्याकडून संस्थापक अध्यक्ष ऍड. विक्रांत वाघचौरे, जनसंपर्क अधिकारी समीर परब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य मीडिया सेल अध्यक्ष प्रसाद शिंदे यांच्या हस्ते रायगड जिल्हा सेक्रेटरी पदी शिवाजी नाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागात समाजसेवक म्हणून शिवाजी नाडकर यांची ख्याती आहे. सन १९९० पासून गेली ३० वर्ष ते समाजसेवा करीत आहेत. दुर्गम भागातील अनेक नागरिकांचे व आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. सर्वजनहारा आंदोलन व परिवर्तन ८४ या सामाजिक संस्थेमध्ये अनेक वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचे हे समाजसेवेचे अविरत कार्य पाहून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटसकडून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवाजी नाडकर यांनी सांगितले की, माझी समाजसेवा बघून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटसने रायगड जिल्हा सेक्रेटरी पदावर नियुक्ती केल्याबाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझे समाजकार्य असेच पुढे या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अविरत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



0 टिप्पण्या