पिंपरी (प्रतिनिधी) : चिंचवड गावातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढत असल्याचे वास्तव पोलीस प्रवाह न्युज ने नुकतेच मांडले होते.या वृत्ताची दखल पालिका प्रशासनाने घेतल्याचे समोर येत आहे.चिंचवड मधील मुख्य रस्त्यांवर असणारे अतिक्रमण हटविण्याच्या सूचना आज ब प्रभाग सभापती सुरेश भोईर यांनी दिल्या आहेत.
चिंचवड गावातील चापेकर चौकात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे.येथील उड्डाणपूला खाली व परिसरात हातगाड्या व्यावसायिकांचे वाढते अतिक्रमण ही मुख्य समस्या आहे.या भागातील जागेवर घोड्यांचे टेबेले उभारले आहेत.अनेक घरगुती साहित्य व भंगाराच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या.1 डिसेंबर ला या बाबत पोलीस प्रवाह न्युज ने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते.
चिंचवड मधील लिंकरोड,काकडे पार्क व मुख्य बसस्थानक परिसरातील रस्त्यांवर सुद्धा अतिक्रम वाढले आहे.या भागात आज भोईर यांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकासह पाहणी केली.रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या व्यवसायिकांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना देऊन कारवाई करण्यात आली.वारंवार तक्रार करूनही पुन्हा अतिक्रमण होत असल्याने याबाबत योग्य नियोजन करावे अशी नागरिकांची मागणी आहे.
या भागातील वाहतूक व वर्दळ पाहता वाहतूक समस्या गंभीर आहे.वाहतूक कोंडी व किरकोळ अपघात टाळण्यासाठी येथील रस्ते मोकळे व्हावेत अशी नगरिकांची मागणी आहे.



0 टिप्पण्या