
माणगांव : दि - १४ - नाभिक रायगड जिल्हा अध्यक्ष सुदामजी शिंदे यांच्या अध्क्षतेखाली सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी माणगाव मध्ये भाऊ पांडे यांच्या निवासस्थानी तालुका नाभिक समाजाच्या मिटिंगमध्ये माणगांव तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. नाभिक समाज तरूण संघ माणगाव तालुका अध्यक्ष पदी सौरभ पांडे, उपाध्यक्ष पदी विलास वसंत यादव, कार्याध्यक्ष पदी प्रदिप बढे, सचिव पदी दिपक चव्हाण ,सहसचिव पदी राजेंद्र जाधव, खजिनदार पदी सुरेश चव्हाण व सहखजिदार पदी अजित हुजरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच आदि सल्लागार समिती व सदस्य महिला सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
या वेळी उपस्थित मान्यवर रायगड जिल्हा अध्यक्ष सुदाम शिंदे, विश्वस्त भाऊ पांडे, विश्वस्त यशवंत खराडे, माजी अध्यक्ष सुरेंद्र पालांडे, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब सोनगिरे, मा. जिल्हा सदस्य सुरेश यादव, गोरेगाव विभाग अध्यक्ष चंदकांत यादव, इंदापूर विभाग अध्यक्ष डॉ.अनंत खराडे, निजापूर विभाग अध्यक्ष अनिल हुजरे, मोर्बा विभाग अध्यक्ष गणेश दिवेकर, मा.सघटक जयंत शिंदे, दिलीप जाधव, नितीन बडे, माणगाव शहर अध्यक्ष शाहनु शहा, कांता हुजरे, अजित शिंदे,अमोल जाधव, निशांत चव्हाण, भरत जाधव, चंद्रशेखर जाधव आदि नाभिक समाज बांधव उपस्थित होते.


0 टिप्पण्या