कोल्हापूर - साके येथील त्या अपघातातील मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबास शाहु समुहचा आधार

 


कोल्हापूर -   शाहू सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील सहकारातील एक उत्कृष्ट कारखाना म्हणुन नामोल्लेख  असुन तेथील कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात संस्थेचा सदस्य म्हणुन सहभागी झाले पाहिजे अशी शिकवण स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांची आहे.

              घरी अठरा विश्व दारिद्रय असलेल्या चर्मकार समाज्यातील शंकर पोवार (साके) यांना स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू सहकारी साखर कारखान्यात काम करण्याची संधी दिली. अत्यंत प्रामाणिक कुशल कामगार म्हणुन काम करत असताना नोकरीमुळे घरची परिस्थिती सुधारत मुलांचे शिक्षण पूर्ण करत असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला आणि जागीच मृत्यु झाला.

                घरातला कर्ता माणुस असा अचानक गेल्या मुळे घरी दुःखाचा डोंगर कोसळला.पण अश्या परिस्थिती मध्ये भा.ज.पा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष आणि शाहु कारखानाचे चेअरमन राजे समरजीतसिंह घाटगे यांनी त्या कुटुंबास आधार देत त्यांच्या वारसांना कामगार नुकसान कायद्यानुसार द्यावी लागणारी रु.12,23,025 इतकी रक्कम वर्ग केली असुन कै शंकर पोवार यांच्या मुलाची उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्याचे DME शिक्षण पुर्ण झाल्यानंतर शाहु साखर कारखान्यात नोकरी देण्याचे हमीपत्र देखील देत कर्मचारी पश्चात कुटुंबाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

                 लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहु महाराज यांनी नेहमीच समाजाभिमुख विचार करून कृतीवर भर दिला. तोच वसा आणि वारसा सहकार महर्षी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी जपला असुन  त्याची जपणूक मी आणि शाहू समुह करत राहील असा विश्वास भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या