पुणे - सातारा जिल्ह्यातून तडीपार/फरार सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई*

 

*पुणे  - कुणाल घोडके, प्रतिनिधी* 


दिनांक 30/09/2020 रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीत गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक श्री महेंद्र पाटील स्टाफ सह पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक शंकर कुंभार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की एक इसम गायमुख चौक स्मशानभूमीच्या गेट जवळ आंबेगाव बुद्रुक पुणे येथे थांबलेला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असून तो ते विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत आहे. सदर इसम अंगाने मजबूत असून रंगाने सावळा आहे त्याच्या अंगात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व काळे रंगाचा ठिपके असलेला फुल बाह्यांचा शर्ट घातल्याची माहिती मिळाल्याने सदर बातमी वरिष्ठांना कळवली असता त्यांनी योग्य कारवाई करण्याबाबत दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार साध्या गणवेशात गायमुख चौक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे येऊन सापळा लावून वॉच करीत थांबलो असता गायमुख चौक स्मशानभूमी गेटच्या जवळ आंबेगाव बुद्रुक पुणे या ठिकाणी मिळालेल्या बातमीच्या वर्णनाप्रमाणे एक इसम संशयितरित्या हालचाली करीत असल्याचे दिसल्याने बातमी मधील तोच इसम असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील यांनी त्यास हटकले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्यास स्टाफचे मदतीने 19.45 वाजताचे सुमारास जागीच पकडून जेरबंद केले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे कमरेस जीन्स पॅन्ट मध्ये खोचलेली एक पिस्टल मिळून आली ती पो. उप निरीक्षक श्री पाटील यांनी  ताब्यात घेऊन त्यास निशस्त्र केले. त्यास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव मयूर महादेव साळुंखे वय 30 वर्ष राहणार मु.पो. कालगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा असे असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात मिळून आलेल्या मालाची पाहणी केली असता किंमत रुपये 25000/- चे एक देशी बनावटीचे पिस्टल व पिस्टल चे मॅक्झिनमध्ये किंमत रुपये 400/-  चे दोन पितळी काडतुसे, असा एकूण किंमत रुपये 25 हजार 400 चा ऐवज जप्त करण्यात आले आहे. सदरचा आरोपी हा उंब्रज पोलीस ठाणे जिल्हा सातारा येथील गुन्ह्यात फरार असून त्याचेवर यापूर्वी खून, दरोडा असे गंभीर गुन्हे आहेत. अधिक तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र पाटील हे करीत आहेत.


 सदरची कारवाई मा. श्री शिरीष सरदेशपांडे, सो पोलीस उपायुक्त परी-2 पुणे शहर, मा. सर्जेराव बाबर, सो सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे, मा. वसंत कुंवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे, पोलीस निरीक्षक गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पो उपनिरीक्षक श्री महेंद्र पाटील, पोलीस हवालदार श्रीधर पाटील, गणेश सुतार, पो ना शंकर कुंभार, प्रणव संकपाळ, समीर बागसिराज, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर, प्रदीप शिंदे यांचे पथकाने केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या