कोल्हापुर प्रतिनिधी ; विनायक सातुसे
संपुर्ण देशभरात कोरोना महामारीचा वाढता कहर बघता मोठी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.अश्यावेळी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस प्रशासन जीवाची बाजी लाऊन कोव्हीड योद्धा म्हणुन काम करत आहेत.
कोल्हापुर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक मा.श्री सुनील पवार सर हे देखील त्यापैकीच एक.कार्यतत्पर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणुन त्यांची विशेष ओळख आहे.पोलीस स्टेशन म्हणजे आपलं घर ह्या भावनेनं ते ऑन ड्युटी 24 तास ते सतर्क असतात.
कोल्हापुर येथील वर्दळीच्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न होता अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवाहन करत असताना जे नागरिक सोशल डिस्टन्स चे अनुकरण करत नसतील त्यांना खाकीचा धाक दाखवत कोल्हापूर शहरात सर्वात जास्त केसेस केल्या आहेत परिणामी कोल्हापुर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत कोव्हीड नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण कर्तव्य पार पाडत आहेत.नकली नोटा तपास,गुन्ह्याचां जलदगतीने तपास करण्यात मोठा हातखंडा असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुनील पवार सरांना पोलीस प्रवाहचा कोव्हीड योध्दा पुरस्कार देताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. सर आपल्या भावी देशसेवेसाठी पोलीस प्रवाह परिवाराकडुन मनःपूर्वक शुभेच्छा.
"कोव्हीड योध्दा" पुरस्कार वितरण प्रसंगी पोलीस प्रवाह चे जिल्हा प्रतिनिधी मा.विवेक पोतदार सर, विनायक सातुसे सर पत्रकार त्याचबरोबर नितेश पोतदार,अमोल पाटील,राहुल लोहार इ. उपस्थित होते.


0 टिप्पण्या