महाड मध्ये पाच मजली इमारत कोसळली - शेकडो नागरीक मलब्यात अडकले.


गिरीश गोरेगावकर ,प्रतिनिधी

रायगड़ : दि.२४ - जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली आहे घटना आज सायंकाळी 6:30 वा घडली. सदर   इमारतीखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत जवळपास 200 ते 250 रहिवासी राहत असल्याची माहिती आहे.  महाड शहरातील काजळ पुरा परिसरात ही दुर्घटना घडली असुन स्थानिक प्रशासन व स्थानिक नागरीक मदतीला सरसावले.

दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे 5 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या 5 मजली इमारतीत साधारण 40 फ्लॅट होते. यात 200 ते 250 लोक राहत होते. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. स्थानिकांनी 17-18 लोकांना बाहेर काढलं आहे.महाड शहरात काजळपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या मलब्याखाली साधारणत: 70 ते 80 रहिवासी अडकल्याची भीती आहे. जेसीबीच्या मदतीने मला हटवण्याचे काम सुरु आहे. बचाव पथक आणि इतर यंत्रणा लवकरच घटनास्थळी पोहोचेल. आतापर्यंत 17 ते 18 लोकांना बाहेर काढलं आहे. ही घटना फार भयावह आहे. या इमारतीत जवळपास  40 फ्लॅट्स आहेत. त्यामुळे  अनेक नागरिक अडल्याची शक्यता आहे.

महाड परिसरात काजळ परिसरात ही इमारत होती. तारीक गार्डन असं या इमारतीच नावं आहे. हि पाच वर्षांपूर्वी बांधलेली इमारतीचे ठेकेदार  युनुस शेख व पटेल होते . सदर इमारतीत  40 कुटूंब रहात होते. इमारत काही तासन पुर्वी हालत असल्याचे लक्षात येताच त्यातील 25 कुटुंब बाहेर पडले पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता आहें.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाडमध्ये इमारत कोसळली, त्याबाबत आमदार भरत गोगावले व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली. असुन या ठिकाणी जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यंमंत्र्यांनी आश्वासन दिले.

तसेच या इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर घटना स्थळी आ. भरत गोगावले व माजी आ. माणिक जगताप पोहचले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या