कोल्हापूर-शिरोळ
येथील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व प्रसादजी धर्माधिकारी यांची आज बुधवार दिनांक-26-08-2020 रोजी पहाटे कोरोना आजाराने मृत्यू झाल्याने संपूर्ण शिरोळ व पंचक्रोशीतील भागात शोककळा पसरली.
त्यांची पत्नी नगरसेविका तर ते स्वतः ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत होते.
अतिशय मनमिळावू, उत्कृष्ट वक्ता, संघटन कौशल्य, इतिहासाचे अभ्यासक,सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून त्यांची ख्याती होती.
अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष,,कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघ संचालक, पंचगंगा नदी प्रदूषण समितीचे संस्थापक, छत्रपती ताराराणी महाआघाडी चे संस्थापक अशा विविध पदावर प्रामाणिक आणि सचोटीने काम करीत त्यांनी आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनात वेगळी छबी निर्माण केली होती.
सोनार समाजातील अनेक विषयांना वाचा फोडून सरकार दरबारी समाजासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा करून तसेच जनसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी अनेक वेळा त्यांनी आंदोलने देखील केलेली होती.
अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आज प्राणज्योत मावळल्याने संपूर्ण समाजातून हळहळ व्यक्त होत आहे..


0 टिप्पण्या