रविंद्र कुवेसकर , प्रतिनिधी
माणगाव : दि २६ - कोरोनाच्या प्रादूर्भावा मुळे भाद्रपद महिन्यात गणेश पूजेल उपाध्येय गुरुजी उपलब्ध नसतिल तर सर्व भाविकांना सहज आणि सोप्या पद्धती मध्ये मनोभावे निर्विघ्नपणे पूजा करता यावी यासाठी माणगांव मधिल पौराहित्य करणारे गुरुजी प्रसाद खरे यांची गणेश प्राणप्रतिष्ठा व उत्तरपूजा ध्वनिफीती माणगांव मध्ये उपयुक्त ठरल्या आहेत. तसेच रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगडातही अनेकांनी लाभ घेतला. परदेशातही अबुधाबी येथे यावरुनच गणेश पूजा प्राणप्रतिष्ठा करण्याचा आनंद लोकांनी घेतला. दरवर्षी प्रमाणे गुरुजी मिळणार नाही या दृष्टीकोनातून सर्व सविस्तर माहिती देत, संपूर्ण पूजा आणि विधी स्वतःचे आवाजात मुद्रित ध्वनीफीत व्हाट्सअॅपवर शेअर केली होती.
ही ध्वनीफीत सोशल मिडियावर वाऱ्यासारखी पसरली प्रसाद गुरुजींना अनेकांनी धन्यवाद देण्यासाठी अगदी परदेशातूनही फोन केले. यंदा आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पहाटेच्या मुहुर्तावर गणेशाची पूजा प्राणप्रतिष्ठा करणाऱ्यांची लगबग धांदल नव्हती. ही ध्वनीफीत मोबाईल वरुन ऐकत त्याप्रमाणे कृती करीत पूजेच समाधान मिळाल्याचे अनेकांनी अनुभवले. ही कल्पना कशी सूचली, हे प्रसाद खरे यांना विचारले असता, त्यानी गणरायाची कृपा, मी मोबाईलवर मंत्रोच्चार करीत गेलो आणि सहज सोपी षोडषोपचार पूजेची ध्वनीफीत तयार झाल्याचे म्हटले आहे.




0 टिप्पण्या