मला वॉचमन शिंदे 2 ते 3 दिवस दिसले नाहीत म्हणून मी ड्युटीवर असलेले वॉचमन याना विचारल्यावर सर्व हकीकत कळाली. मला ऐकून वाईट वाटले मग मी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे कुटुंबाची भेट घेतली तेंव्हा त्यांची अवस्था फार वाईट होती, सर्व कुटुंब मला पाहून फार रडले,त्यांना अपेक्षितच नव्हते की सोसायटी मधील कोणी वॉचमन ला पहायला येईल, त्यामुळे मला पाहून धीर वाटला त्यांनी सर्व व्यथा मला सांगितली,, मग मी डॉक्टरांची व मॅनेजमेंट ची भेट घेऊन थोडा पदाचा वापर करून विनंती केली तेंव्हा त्यांनी 57000 रुपये बिल फायनल केले, शिंदे कुटुंबाकडे 7000 रुपये फक्त होते, रक्कम मोठी होती मला एकट्याने भरणे शक्य नव्हते, मग मी काहीतरी करतो, काळजी करू नका असे सांगून घरी आलो,पण मला सारखे शिंदेचे कुटुंब डोळ्यासमोर दिसत होते,, शेवटी मी सोसायटी ऑफिसमध्ये गेलो व कमिटीतील लोकांना बोलावून घेतलं आणि सर्व हकीकत सांगितली. आपण सर्वजण सामाजिक बांधिलकी, माणुसकीच्या अनुषंगाने मदत करायला पाहिजे असे सांगितले आणि शिंदे हे बरे झालेनंतर परत कामावर येतील असे वाटत नाही हे ही सांगितले,, हे सर्व ऐकले नंतर सोसायटी चे सेक्रेटरी यांनी लगेच सोसायटी ग्रुपवर माहिती टाकून मदतीचे आवाहन केले. मला अपेक्षा होती की प्रत्येक सभासद 100 ते 200 किंवा जास्तीत जास्त एखादा सभासद 500 रुपये देईल, मग उर्वरित रक्कम आपल्याला काहीतरी करून जमवावी लागेल.परंतु माझ्या आवाहनाला फार चांगला प्रतिसाद मिळाला,, प्रत्येक सभासदाने1000 ते 2000 तर एकाने 5000 रुपये असे पैसे जमा केले,विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी आलेल्या भाडेकरूने स्वतः येऊन पैसे दिले, त्यामुळे 56500 रुपये जमा झाले,, आणि आमचे सोसायटी तील कमिटी सदस्य सोबत आले, आणि आम्ही जाऊन पैसे लगेच भरले .जेव्हा पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो तेंव्हा शिंदे कुटुंबाचा आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट चा विश्वास बसत नव्हता की खरच एखादी सोसायटी वॉचमन जो कॉन्ट्रॅक्टर कडे काम करतो आणि त्याचा अपघात ड्युटी सम्पवून घरी जाताना झाला, तसा सोसायटीचा काही संबध नव्हता,, तरीही सर्वांनी माणुसकी दाखवली, त्यामुळे त्यांचे ऑपरेशन झाले आणि कर्ज काढण्याची वेळ आली नाही,जर त्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले असते तर ते कुटुंब परत कधीच सावरले नसते आणि त्याची वाताहत झाली असती,,,
यामध्ये पोलीस बांधव प्रशांत पवार यांनी ज्या प्रकारे मदत केली त्यामुळे पोलीस बांधवांवर नागरिकांचा विश्वास आणखी बळकट होईल
या प्रसंगावरुन एक गोष्ट लक्षात आली की शिंदे वॉचमन हे नेहमी प्रत्येकाला हात जोडून नमस्कार करत, सर्वाशी हसून नम्रपणे बोलत, वारकरी होते, त्याच बरोबर स्वाध्याय परिवाराचे सदस्य होते,आणि कामात तत्पर होते.त्यांचे याच चांगल्या कर्माचा, वर्तुणुकीमुळे दैवाने त्यांचे मदतीला धावून यायला सोसायटी ला सद्बुद्धी दिली,,


0 टिप्पण्या