माणगावचे पोलीस निरिक्षक रामदास इंगवले यांची कोरोनावर मात.

 

रायगड़ - परेश शिंदे.

रायगड़ : दि. २१ -  माणगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी कोरोना विषाणूवर यशस्वी मात करीत ते शुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०२० रोजी पुन्हा नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी कामावर रुजू झाले आहेत. त्यांचे माणगाव पोलीस ठाण्यात सेवा बजावण्यासाठी हजर झाल्यावर  त्यांचे पोलीस अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करुन स्वागत केले. 


पोलीस निरिक्षक रामदास इंगवले यांनी कोरोना संकटात आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून कर्तव्याशी तत्पर राहत समाजाची सेवा केली आहे. समाजाची सेवा दिवसरात्र करताना पोलीस निरिक्षक रामदास इंगवले यांना ३ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. योद्धासारखे समाजात काम करणारे माणगाव तालुक्याचे पोलीस निरिक्षक रामदास इंगवले यांनी कोरोनावर मात करून पुन्हा ते समाजाच्या सेवेसाठी आपले कर्तव्य बजाविण्याच्या उद्देशाने कामावर हजर झाले असून शुक्रवारी त्यांचा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुष्पवृष्टी टाकून स्वागत करण्यात आले.

                        पोलीस प्रवाह न्यूज़


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या