गिरीश गोरेगावकर, प्रतिनिधी
गोरेगाव : दि २८- संपूर्ण रायगड जिल्हातील ग्रामपंचायतीनें 28 एप्रिल 2020 च्या वेतन कपात करणाऱ्या शासन निर्णया विरूध्द कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन आज दि. 28/08/2020 रोजी पुकारलेल्यानें ग्रामपंचायत गोरेगाव येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे गोरेगाव ग्रामपंचायत कार्यालय नाममात्र चालू असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
28 एप्रिल चा शासन निर्णय हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घातक असुन शासन एका हाताने आम्हांला देत आहें तर दुसऱ्या हाताने घेत असल्याने शासनाना विरुद्ध रोश निर्माण झाला आहें. याचाच विरोध म्हणुन आज रोजी संपूर्ण माणगाव तालुक्यात कामबंद आंदोलन करण्यात आले होते , त्यात ग्रामपंचायत कार्यालय गोरेगाव मधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.
या आंदोलनात संघटनेंचे अध्यक्ष महादेव आंबेतकर , , सुभाष वाघे , धनंजय नार्वेकर सह सफाई कर्मचारी, कार्यालयीन व पाणी पुरवठा कर्मचारी सर्व सहभागी झाले होते.
1) शासनाने 20 एप्रिल 20 रोजी शासन निर्णय रद्द करा. पंचायतीची वसुली व उत्पन्नाची अट बंधनकारक केल्यामुळे व त्याचप्रमाणे लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध अद्याप चालू असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उत्पन्नाच्या प्रमाणातच 50% आणि 75%वेतन मिळणार. 2) 20 एप्रिल चा शासन निर्णय रद्द करून शासन मान्य करून किमान वेतन 100% शासनाने अदा करावे 3) या आणि इतर प्रलंबित मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.



0 टिप्पण्या