गोरेगांव उपसरपंचपदी विनोद बागडे.

 
गिरीश गोरेगांवकर , प्रतीनिधी 

गोरेगांव: दि १४ - गोरेगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विनोद बागडे यांची बिनविरोध निवड झाली . उपसरपंच चंद्रकांत गोरेगांवकर यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदाचा राजीनामा दिला होता . त्या रिक्त झालेल्या पदासाठी काल ( शुक्रवारी ) निवडणूक घेण्यात आली .
सरपंच जुबेर अब्बासी यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी विनोद बागडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने श्री अब्बासी यांनी बागडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 
यावेळी  सरपंच झूबेर अब्बसी ,राष्ट्रवादी चे नेते विकास गायकवाड, मंगेश कदम,  मावळते उपसरपंच चंद्रकांत गोरेगांवकर सदस्य सचिन बागडे , सूरज पवार , सौ . मोहिनी गोरेगांवकर , सौं अरूणा शेठ , सौ . लोखंडे सलीम रखांगी , सौ . पानवकर , सौ . वैष्णवी पितळे , सौ प्राजक्ता इस्वलकर . श्रीमती खंडेलोट ,  सौ . वर्षा लाड यांच्यासह ग्राम विस्तार अधिकारी श्री पोळेकर उपस्थित होते . श्री बागडे यांचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या