अहमदनगर - सुरेगाव आणि आजूबाजूच्या गावांना अतिवृष्टीचा तडाखा....महावितरण कार्यालयाला तलावाचे स्वरूप..

प्रतिनिधी- गणेश बत्तासे {सुरेगाव}

आज दिनांक 24 जुलै रोजी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव व त्याच्या बाजूला असलेल्या सर्व गावामध्ये अतिवृष्टी झाली.  किमान दोन तास चालणाऱ्या ह्या पावसाने अक्षरशा थैमान घातले.  भरपूर प्रमाणात नागरिकांचे नुकसान झालेले असून पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणात ओढ्या नाल्यामधून पाणी रस्त्यावर वाहत येत असल्याने पूर्ण रस्ते हे अदृश्य झाले होते.
    सु रेगाव परिसरातील काल झालेल्या तुफान पावसामुळे महावितरण कार्यालय यार्डात देखील पाणी शिरले सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल २ तास वीजपुरवठा खंडित ठेवावा लागला
कंपनीचे त यंत्र चालक श्री राऊत एन वी , श्री सानप वी के, वरीष्ठ तंत्रज्ञ चौधरी, प्रवीणअंभिरे, विद्युत सहाय्यक धनंजय बंद्रे, बाह्यस्त्रोत कर्मचारी बंडू शिंदे, शिकाऊ निशांत गवळी, शुभम कांदळकर व सहकारी कर्मचारी यांनी कंपाऊंड भिंत फोडून अथक परिश्रमानंतर पाणी बाहेर काढले व वीजपुरवठा सुरळीत केला पावसामुळे अशी वेळ महावितरण वर ही येते म्हणून लाईन गेल्यावर ग्राहकांनी संयम रखावा अशी विनंती करण्यात आली.

           घरामधील संसारोउपयोगी सर्व वस्तूंचे नुकसान झाले असून संपूर्ण घरात पाणी पसरले होते तसेच जनावरांच्या गोठ्यामध्ये व कांदयाच्या चाळीमध्ये हे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे.तसेच सुरेगाव ते झगडे फाटा आणि सुरेगाव ते लासलगाव ला  जाणाऱ्या रस्त्यामध्ये जास्त  प्रमाणात पाणी साचल्या कारणाने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता.
सुरेगाव,कोळपेवाडी व शहाजापूर भागामध्ये शेतीचे  नुकसान झाले असून पूर्ण शेतामध्ये पाणी झाल्यामुळं ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
       तसेच या भागातील तसेच या भागातील काही व्यापाऱ्यांच्या गोडाऊन मध्ये देखील पावसाचे पाणी घुसल्याने मालाचे नुकसान झालेले आहे.
            सोयाबिन बियाणे फसवणूक व दुबार पेरणीच्या फटक्यामुळं शेतकरी त्रस्त असताना 3 दिवसापासून चाललेल्या या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले असून पूर्ण कोपरगाव बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला असून कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे करावे अशी मागणी सुरेगावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या