कोल्हापूर - वेशीत अडकलेला कोरोना सिद्धनेर्लीत. एकाचा अहवाल पॉझिटिव्ह - परिसरात भीतीचे वातावरण

प्रतिनिधी - सिद्धनेर्ली, विवेक पोतदार

ता.25. अखेरीस आज सिद्धनेर्लीत कोरोनाचा शिरकाव झाला असून 35 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला. रुग्णांच्या घरा जवळील संपूर्ण परिसर ग्रामपंचायती कडून सील करण्यात आले आहे.

    सिद्धनेर्ली च्या चारही बाजूला कोरूना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असताना कागल तालुक्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सिद्धनेर्लीत आजपर्यंत एकही स्थानिक रुग्ण आढळला नव्हता यामुळे ग्रामपंचायत व दक्षता समितीच्या कामाचे कौतुक होत होते. काल संध्याकाळी उशिरा 35 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रातील सर्वांचे फोन कडाडू लागले.
  सदर तरुणाच्या घरी काही दिवसांपूर्वी नातेवाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जवळील व्यक्तींची सांत्वनासाठी वर्दळ होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बाधित युवक कोल्हापुरात त्यांच्या मृत नातेवाईकाच्या सेवेस होता,त्या दवाखान्यातील डॉक्टर सह कर्मचाऱ्यांना लागण झाली होती तेथेच त्याला संसर्ग झाला होता.त्याच्या संपर्कात आलेल्या चौघांना दवाखान्यात दाखल झाले असून आज दोघांना हलविले आहे ,दरम्यान तरुण ज्या परिसरात राहतो तो संपूर्ण परिसर ग्रामपंचायतीच्या वतीने सील केला असून सर्वत्र औषध फवारणी करण्यात आली आहे.
या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम ग्रामपंचायत,कोरोना दक्षता कमिटी व आरोग्य विभागाकडून सुरू आहे.
  सिद्धनेर्ली कोरोनाचा शिरकाव झाला आहे,मात्र नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी असे आवाहन सरपंच अरुणा पाटील व मा.उद्धव पोतदार (पोलीस पाटील) यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या