कृषी पदवीधर करणार जगाला कोरोना मुक्त ; मानवावरील परीक्षणास परवानगी.

 
  अरुण पवार , प्रतिनीधी

       माणगांव : दि ५ - संपूर्ण जग कोरोना नामक महामारी ने ग्रासलेले असल्यामुळे प्रत्येकाला स्वप्न पडत  आहेत या रोगा वरील लसीचे हे स्वप्न, दिवा स्वप्न न राहता काही दिवसात ही वास्तवता होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. ही सर्व किमया घडणार आहे ते डॉ. पं. दे. कृ. वि . अकोला संलग्नित , महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविदयालय  वरोराचे माजी विद्यार्थी डॉ. कृष्णा इल्ला यांच्या नेतृत्वात होत आहे.
 
 डॉ. कृष्णा इल्ला हे मूळचे तामिळनाडू राज्यातील असुन कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते भारत बायोटेक या संस्थेचे चेयरमन तथा व्यवस्थापकीय संचालक या  पदावर कार्यरत  आहेत. भारत बायोटेक हैदराबाद च्या नेतृत्वात  भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद , नवी दिल्ली तथा राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोवेक्सीन ' नामक लस  विकसित करण्यात येत आहे. आज पर्यंत या लसीचे परीक्षण प्री क्लिनिकल चाचणी अंतर्गत प्राण्यांवर यशस्वी रित्या करण्यात आलेले आहे. नुकतीच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया च्या वतीने पुढील मनुष्या वरील परीक्षणाच्या दोन टप्प्याना परवानगी  दिलेली आहे. जुलै महिन्यात या परीक्षणाला सुरवात झालेली असुन मनुष्यावरील चाचणीची पहिली लस भारत बायोटेकचे उपाध्यक्ष डाॅ. वि.के श्रीनिवास यांनी  टोचून घेऊन पुर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे .
      
          भारत बायोटेक संस्थेने आज पर्यंत पोलिओ , रेबीज , रोटावाइरस , H1N1 , चिकनगुनिया सारख्या 16 रोगांवर लसी  विकसित केलेल्या  आहेत . इतका अनुभव लक्षात घेता कोवेक्सीन विकसित करण्याचा विश्वास डॉ . कृष्णा इल्ला यांनी व्यक्त केलेला आहे. सध्या जगात भारत बायोटेक कोरोना लस संशोधनात आघाडीवर असुन  येत्या काही दिवसात ही लस उपचारार्थ   उपलब्ध असेल असे त्यांनी सांगितले. 

डॉ. कृष्णा इल्ला हे  कृषी पदवीधर असुन त्यांनी पुढील शिक्षण अमेरिकेत घेतले आहे. त्यांच्या या गरुड झेपे बद्दल आनंदवन परिवार व कृषी  शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त केला जातोय. डॉ. कृष्णा यांचे पदवीचे शिक्षण श्रध्देय बाबा आमटे यांच्या संघर्षशील  आनंदवन मधे झाले आहे. 

कोंडलेल्या वादळांच्या, ह्या पहा अनिवार लाटा 

माणसांसाठी उद्याच्या,येथुनी निघतील वाटा, 

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई 

दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही.... 

 या काव्य पंक्तीची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. 

            या  यशा बद्दल संस्थेचे सचिव डॉ . विकास आमटे , सर्व विश्वस्त तथा प्राचार्य  डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी अभिनंदन केले आहे. 
 
                                     पोलीस प्रवाह न्यूज


       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या