माणगावकरांच्या सहकार्यानेच पाणी पूरवठा सुरळीत करण्यात यश सभापती जयंत बोडेरे.

 
रविंद्र कुवेसकर  प्रतिनिधी

माणगांव, दि. ४ - जलशुध्दी केंद्र, जॅकवेल जवळील खंडित विज पुरवठा पूर्ववत सुरु झाल्याने केंद्रातील सर्व पंप व यंत्रणा सुसज्ज केली आहे. १ जुलै पासून पाणी पूरवठा सूरळीत झाल्याची माहिती नगरपंचायतचे पाणी पूरवठा सभापती जयंत बोडेरे यांनी दिली आहे.

तसेच आपल्या सभापती कालावधित नैसर्गिक आपत्ती एकामागोमाग आल्या तरी पाणी पूरवठा कर्मचारी यांची मेहनत सहकाऱ्यांची साथ नगरपंचायत मुख्याधिकारी राहूल इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन कनिष्ट अभियंता आकाश बुवा तसेच जनतेच्या सकारात्मक सहकार्याने पालकमंत्री आदिती ताईंच्या माध्यमातून या कठीण प्रसंगातही लोकांना पाणी देण्यात आपण यशस्वी झालो. पाण्याचा अपव्यय टाळा तसेच भविष्यात पाणी पूरवठा नियोजनात असेच  सहकार्य नागरिकांकडून अपेक्षीत आहे.

निसर्ग चक्रिवादळाच्या संकटाचा सामना करताना माणगांवचा पाणी पूरवठा ठप्प झाला. महावितरणची दयनिय अवस्था वीज खंडित कधी सुरु होईल निश्चित सांगणे कठिण झाले. चार दिवस पाणी बंद आणि लोकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल झाले होते.

 अशा वेळी माणगांव नगरीच्या नगराध्यक्ष योगिता चव्हाण तसेच सभापती जयंत आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांच्या संकल्पनेतून पर्यायी जनरेटरवर पाणी पूरवठा यंत्रणेचे नियोजन केले. यासाठी कालीदास डेकोरेटर व चेतक कंपनी कडून भाडे तत्वावर आणलेल्या डिझेल जनरेटरवर ती योजना ३० जून पर्यंत राबविली एक दिवस आड का होईना लोकांना पाणी देण्यात यश आले.  लोकांनी पाणी उकळून गाळून पिण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. माणगांवकरांनी देखिल चांगले सहकार्य केले.

                               पोलीस प्रवाह न्यूज

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या