कोल्हापूर - बांधकाम कामगारांच्या आपत्कालीन निधीमध्ये वाढ करून तांत्रिक अडचणी दूर करा. लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी- विवेक पोतदार, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदीत बांधकाम कामगारांना कोविड१९ या काळामध्ये दोन हजार रुपये आपत्कालीन निधी देण्याचा कामगारांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे परंतु संबंधित निधी हा अजून बहुतांशी कामगारांच्या खात्यावर वर्ग झालेला नाही. त्यामुळे कामगारांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे.

            ऐनवेळी आलेल्या आपत्कालीन संकटामुळे  बहुतांशी कामगार नूतनीकरणापासून अलिप्त आहेत त्यामुळे त्या कामगारांना आपत्कालीन निधीचा लाभ मिळताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून आपण तातडीने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांना आदेश करून ज्या बांधकाम कामगारांना नोंदीनी, नुतणीकरण करून दोन वर्ष पूर्ण झालेली नाही त्या सर्व कामगारांच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग करण्याचा आदेश द्यावा. तसेच हा निधी अत्यंत तोकडा असल्यामुळे यामध्ये अजून १० हजार रूपयांची वाढ करून कामगारांच्या खात्यावर उर्वरित रक्कम वर्ग करावी तसेच बांधकाम कामगारांच्या नोंदणी नुतणीकरणाचे कामकाज तातडीने सुरु करण्यासंबंधीचे आदेश करावेत अशा मागणीचे निवेदन मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरवसो यांच्या तर्फे देण्यात आले.
      यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम कॉ. भगवानराव घोरपडे, कॉ. दत्ता गायकवाड, कॉ. सर्जेराव मगदूम आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या