कोल्हापूर - साके येथे रस्त्यावरच वृक्षारोपण ; संवर्धन करण्याचा विसर

कोल्हापुर प्रतिनिधी ; विनायक सातुसे

साके ता.कागल येथे वृक्षारोपण साठी आणलेली झाडांची रोपे रस्ता लगत ठेवली होती.त्या रोपांचे रोपण करण्याचा विसर पडला आणि ती झाडे आत्ता वाळली आहेत.

साके येथील साके सावर्डे रोड वर वृक्षारोपण करण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाकडून झाडे आणली गेली होती ती रस्त्या जवळ ठेवली पण गेली पण त्या रोपांसाठी खड्डे काढणे आणि त्यांचे वृक्षसंवर्धन करण्याचा विसर प्रशासनास पडल्यामुळे परिणामी त्या रस्त्यावरील शेकडो रोपे वाळली असुन त्या रोपांची माती निघाली आहे तर पाणी न मिळाल्याने हळूहळू मृत होत असल्याचे दिसत आहे.

गेली आठ दिवस त्याकडे प्रशासनाचे लक्ष नसुन ती झाडांची रोपे जिवंत आहेत की नाहीत हे पण प्रशासनास माहीत नाही.पुर्ण दुर्लक्ष झाल्याने गावात ह्याबद्दल पुर्णतः नाराजी आहे.गावातील काही होतकरु बांधकाम कामगार थोडक्या मोबदल्यात हे काम करण्यासाठी आग्रही असताना गावामध्ये असणाऱ्या ग्रामसेवक यांनी त्यांना कोणताच प्रतिसाद दिला नसुन आत्ता तरी ग्रामप्रशासन जागे होऊन वृक्षारोपण करते की फक्त त्याचा कार्यक्रम करनार असा प्रश्न नागरिकांतुन विचारला जात आहे


"संबंधित वृक्षांची जोपासना करणेसाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय येथे आंदोलन करणार"
अमोल पाटील (सामाजिक कार्यकर्ते)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या