जळगाव जिल्हा प्रतिनिधी - जितेंद्र चौधरी
जळगाव शहरातील शिव कॉलनी उड्डाण पुलाजवळ असणार्या स्टेट बँकेच्या शाखेजवळ असणारे एटीएम गॅस कटरने फोडून तब्बल १४ लाख रूपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हायवे नं ६ ला लागून शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडे स्टेट बँकेची शाखा आहे. याच्या बाहेर एक एटीएम सेंटर आहे. आज सकाळी हे एटीएम सेंटर तोडले असल्याचे या परिसरातील रहिवाशाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती शाखा व्यवस्थापक दिवेश चौधरी यांना कळविली त्यांनी लगेचच पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासणीमध्ये संबंधीत एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी १४ लाख ४१ हजार रूपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या एटीएममध्ये अजून सात लाख रूपयांची रोकड असल्याचे दिसून आले. या संदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळी भेट दिली असून जिल्हा पेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बँकेतील सीसीटिव्हीची पाहणी केली असता यात तीन चोरटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. ।। पोलीस प्रवाह न्युज ll




0 टिप्पण्या