जळगाव जिल्हा प्रतिनिधी - जितेंद्र चौधरी
जळगाव जिल्ह्यात असलेल्या भुसावळ तालुक्यातील खडका परिसरात एका संशयित आरोपी गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून एका संशयितास अटक केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ गजानन राठोड बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबा साहेब ठोंबे, व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, पोलीस हे कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, रवींद्र पाटील ,इंद्रिस पठाण, रमण सुरडकर ,विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींचे पथक तयार करून या पथकाने धडाकेबाज कारवाई केली. यात संशयित आरोपी रोशन भीमराव सपकाळे(रा. खडका)यास खडका-कीन्ही रस्त्यावर पाण्याच्या टाकी जवळ अटक करण्यात आली आहे.
। पोलीस प्रवाह न्युज



0 टिप्पण्या