जामखेड प्रतिनिधी :- सागर पवार
पोलीस प्रवाह न्युज
रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या होमिओपॅथिक, फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयाचा वतीने जामखेड शहरात कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे पाटील यांनी स्वखर्चाने तब्बल दहा टन कलिंगड शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी करून नागरिकांसाठी घरोघरी जाऊन वाटप केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण जामखेड शहरात आढळून आल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जामखेड शहर दिनांक तेवीस एप्रिल ते 10 मे पर्यंत हॉटस्पॉट जाहीर केले होते.त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यातच कडक उन्हाळा जाणवत होता. या सर्व बाबींचा विचार करून रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे पाटील यांनी जामखेड शहरातील नागरिकांना घरोघरी जाऊन मोफत कलिंगड वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यातच जामखेड तालुक्यातील पाटोदा गावातील मागासवर्गीय समाजातील प्रयोगशील शेतकरी श्री.संतोष कानडे हे आपल्या शेतातील कलिंगडाला मार्केट उपलब्ध होत नसल्याने हवालदिल झाले असताना डॉ. भास्करराव मोरे पाटील यांनी त्या शेतकर्याकडून त्याचे दहा टन कलिंगड बाजारभावापेक्षा जास्त किमतीने खरेदी करून हवालदिल झालेल्या शेतकर्याला आधार दिला व त्याच बरोबर हॉटस्पॉट मुळे अडकलेल्या जामखेड करांना घरोघरी जाऊन मोफत कलिंगड वाटप करून त्यांना देखिल आधार देण्याचे काम केले आहे. त्यासाठी संस्था प्रतिनिधी रोहीत राळेभात, किशोर भाकरे, रविंद्र ढवळे,प्रताप पवार, मुरली भारती, अन्वर आतार, आसाम शेख इत्यादि कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कामी सामाजिक कार्यकर्ते विक्रांत घायतडक व ओंकार दळवी यांनी खुप मेहनत घेतली. या उपक्रमा बद्दल डॉ.भास्करराव मोरे पाटील यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेच्या होमिओपॅथिक, फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आलेला असुन सदर कक्षात विलगीकरण करण्यात आलेल्या अडोतीस लोकांना रोज नियमितपणे उत्तम जेवणा बरोबरच उत्तम दर्जाचे कलिंगड,खरबूज देखील देण्यात येत आहेत.कोरोनाच्या या आपत्तीच्या काळात रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेच्या माध्यमातून डॉ.भास्करराव मोरे पाटील व त्यांचे सर्व कर्मचारी हे जामखेड करांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करून कोविड योध्याची भूमिका निभावत आहेत.




0 टिप्पण्या