सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या. माणगांव तर्फे एक लाख रुपयाचा धनादेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास.!


वैभव सत्वे, प्रतिनिधी

 माणगाव :दि ४ - कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड यांना आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून माणगांव तालुक्यातील पतसंस्थेमध्ये अग्रेसर असलेल्या  सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या. माणगांव यांच्या तर्फे एक लाख रुपयाचा धनादेश माणगांव तालुक्याच्या तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांच्याकडे दि. ४ मे रोजी सुपूर्द करण्यात आला.

   यावेळी सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या. माणगांवचे चेअरमन दिपक गणपत साबळे, व्हाईस चेअरमन चंद्रशेखर देशमुख, संचालक गोपाळ पवार, इकबाल धनसे, प्रकाश तळकर, सूर्यकांत काळे, मॅनेजर स्नेहा टवळे व पतसंस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

   या संस्थेची स्थापना ७ ऑगस्ट १९९० साली माजी आमदार कै. अशोकदादा साबळे यांनी केली होती. तेव्हा पतसंस्थेचे पहिले  चेअरमन कै. बाबूरवजी भोनकर, व्हा. चेअरमन पितांबर लालजी मेथा यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. तसेच या संस्थेमध्ये सभासद ४७५० असून ठेवी २३ कोटी तर कर्ज २० कोटी या पतसंस्थेच्या शाखा माणगांव, इंदापूर, मोर्बा, निजामपूर, गोरेगाव व तळा येथे असून सर्व शाखामध्ये वीज बिल स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे.तसेच इंदापूर, मोर्बा व गोरेगाव मध्ये लॉकर सुविधा सुद्धा देखील उपलब्ध आहे.

   संपूर्ण जगात कोरोना या महामारीचे संकट ओढावले असून  देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यानी कोरोनाग्रस्त परिस्थितीवर मात करण्याकरिता आर्थिक साहाय्य करण्याविषयी आव्हान केले होते. या आव्हानाला अनुसरुन सह्याद्री ग्रामीण बिगरशेती मर्या. पतसंस्था माणगांव यांनी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी रायगड यासाठी एक लाख रु. सहाय्यता निधी व या विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला आपण रायगडवासीय म्हणून मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला हातभार लावला.

 या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात या पतसंस्थेने केलेल्या या मोलाच्या आर्थिक सहकार्याबाबत माणगांवच्या तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांनी या संस्थेचे विशेष आभार मानले.

                            पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या