माणगावात १२ आरोपीवर गुन्हे दाखल ; संचार बंदी व कलम १४४ चे उल्लघन!

माणगावात १२ आरोपीवर गुन्हे दाखल ; संचार बंदी व कलम १४४ चे उल्लघन !

माणगाव - अरुण पवार 

     संपूर्ण राज्यात संचार बंदी व कवम १४४ लागू असताना माणगाव तालुक्यात या आदेशाची पायमल्ली होत आहे. कोरोनाची लागण पसरु नये. या करिता सरकारने ठोस पावले उचलली आहेत. मात्र काही जणे या कोरोनाची गंभीर दखल घेत नसल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तरीसुद्धा अतिउत्साही हे आदेश धाब्यावर बसवून आपला धंदे गुपचुप करीत आहेत. परंतू त्यांचे हे मनसुबे माणगाव पोलिसांनी गुन्हे दाखल करून धुळीस मिळविले आहेत.
         माणगाव तालुक्यातील दि. ४ एप्रिल ते ७ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत १२ आरोपींवर गन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दुचाकी व इतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून काहींची वाहने जप्त करण्यात आली आहेत. प्रशासनाने वारंवार सूचना देउन सुध्दा न ऐकणार्यांवर गुन्हे आणि दंडात्मक कारवाई होत आहे.
          दि. ४ व ५ एप्रिल रोजी गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ आरोपी आपल्या वाहनांमधून अवेध प्रवासी वाहतूक करीत होते.
त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर ६६/१९२तर टेंंम्पोतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या आरोपीवर २६९,२७१,१८८ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगावच्या बाजारपेठेत आरोपी दुकान मालक संचार बंदी असताना दि. ७ एप्रिल रोजी दु.१ वा.माल विकत असताना पकडल्याने त्याच्यावर १८८ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निजामपूर जवळील कोस्ते बु.येथे विनापरवाना व गैरकायदा तीन पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आल्याने ७ आरोपींवर १८६७ कायद्यानुसार १२ अ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे आरोपी एकत्र बसून तीन पती जुगार खेळत होते.
         तसेच पुरार येथील एका घरात एक आरोपी चोरटा लपून बसला होता. त्याने घरातून बाहेर काढणार्यावर प्रतिहल्ला करून त्याने ठार मारण्याची धमकी दिल्याने त्याच्यावर कलम ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचार बंदीच्या काळात वाहतूकीचे नियम तोडल्याने व विनाकारण फिरत असल्याने तालुक्यातील सुमारे ३०० जणांविरुद्ध दंड वसूल करण्यात आले आहेत. माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकीरण काशीद, पोलिस निरीक्षक  रामदास इंंगावले यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तालुक्यातील पोलिस रात्रंदिवस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व कायदा सुव्यवस्था तसेच शांतता राहण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या