श्रीकांत नांदगावकर, प्रतिनीधी
तळा : दि . ९ - राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तळा शहरात नगरपंचायतीकडून निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली या निर्जंतुकीकरण कक्षाचे उद्घाटन तळा तहसीलदार ए.एम.कनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे,मुख्याधिकारी माधुरी मडके, पो नि. सुरेश गेंगजे आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसेंदिवस राज्यात कोरोना बधितांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेता रायगड जिल्हाधिकारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्याचे आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी करीत तळा नगरपंचायतीमार्फत तळा शहरातील बळीचा नाका येथे या निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली.
त्या शेजारी कक्षात प्रवेश करताना हाथ वर करून चालावे,चालताना वर बघु नये,मास्क काढू नये,कक्षातून जाताना डोळे बंद ठेवावेत,व लहान मुलांची काळजी घ्यावी आशा महत्वाच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहे.तसेच शहरातील काही प्रमुख ठिकाणी नागरिकांना हाथ धुण्यासाठी नळ आणि हँडवॉशची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.या सुविधांचा जास्तीतजास्त नागरिकांनी वापर करून कोरोना विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown#Tala #raigad #Mangaon #Maharashtranews

0 टिप्पण्या