रामजी कदम,प्रतिनीधी
निजामपूर : दि २४- कोरोनाच्या महाभयंकर संकटात खाजगी प्रवासी वाहतूक करत असलेल्या रिक्षाचालकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होत चालला असून , त्यांना यथाशक्ती मदतीचा हात देण्यासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांनी निजामपूर शहरातील मिनिडोअर आणि छोट्या पेट्रोल रिक्षा चालकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. मागील महिनाभरापासून देशभर लाॅकडाऊन असल्याने सर्वसामान्य नागरिकांपासून व्यापारी , छोटेमोठे व्यावसायिक, फेरीवाले तसेच खाजगी रिक्षा चालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
निजामपूर शहरातील बाजारपेठ बंद असल्याने आसपासच्या खेडेगावातील ग्राहक येण्याचे टाळत आहेत. तसेच खाजगी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे रिक्षाचालकही संकटात सापडले आहेत. वाहनकर्जाचे हप्ते , कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवताना रिक्षाचालक मेटाकुटीस आले आहेत. याचीच दखल घेऊन , निजामपूर विभागातील 210 मिनिडोअर आणि पेट्रोल रिक्षा चालकांना महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले आणि उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रशाली जाधव दिघावकर यांच्या हस्ते जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रात कोरोनाचे भीषण संकट घोंगावत असताना , याही कठीण परिस्थितीत मिळालेल्या या भेटीमुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळाला असून याबद्दल रिक्षा चालक संघटनेनी आमदार गोगावले यांचे आभार मानले आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून , गर्दी टाळून जीवनावश्यक वस्तूचे वाटप करताना , जिल्हाप्रमुख अनिल नवगणे , माजी जिल्हाप्रमुख प्रमोदशेठ घोसाळकर, विभागप्रमुख प्रसाद गुरव , सुधीर पवार , अनिल मोरे , पवन कोलवणकर , आणि रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Raigad#Nijampur#Maharashtranews

0 टिप्पण्या