रामजी कदम, प्रतिनीधी
निजामपूर : दि.२४ - जागतिक संसर्गजन्य ठरलेल्या कोरोनाच्या संकटकाळात , रक्ताची कमतरता भासू नये यासाठी अपोलो चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे निजामपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हेच जीवनदान , रक्तदान हेच श्रेष्ठदान असं नेहमीच बोलले जाते.
त्यातच सध्या सगळीकडे रक्तपेढ्यावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हीच बाब लक्षात घेऊन, निजामपूरमधील कोविड - 19 सुरक्षा समितीच्या वाॅरिअर्सनी रक्तदान शिबिरासाठी प्रयत्न केले. शिबिरादरम्यान वैयक्तिक आरोग्य, स्वच्छता , सुरक्षित अंतर बाळगून तब्बल 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान ही सध्याची खूप मोठी गरज बनली असून विशेष बाब म्हणजे या शिबिरामध्ये जवळपास 200 जणांनी इच्छुक नावे नोंदवली होती. परंतु वेळ आणि शिस्तीचे पालन करणेही तितकेच महत्वाचे असल्याने नियोजित वेळेनुसार शिबिर घेतले असून यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते.
कोरोनाचा जागतिक पातळीवर संसर्ग वाढतच असून , शासन स्तरावर शर्थीचे प्रयत्न होत असताना , सुजाण नागरिक म्हणून रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी दात्यांना महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी अवजड वाहतूक सेना माणगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उतेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, डाॅ.बालाजी केंद्रे तसेच अपोलो हाॅस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी अशोक सावंत , डाॅ.जैन , डाॅ.चेतन गोसावी , डाॅ.विजया , तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस विभागीय अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, पवन कोलवणकर, उपतालुकाप्रमुख नितीन पवार , माजी सरपंच बाळाराम दबडे , ज्ञानेश्वर रणपिसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Raigad#Nijampur#Maharashtranews

0 टिप्पण्या