आर.डी. नॅशनल कॉलेज, बांद्रा तर्फे पाणसई गावात मदत.!

निरंजन कळस , प्रतिनीधी

इंदापूर : दि १३ - विभागातील गरीब व आदिवासी लोकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूसाठी सामना करावा लागत आहे. एनएसएसच्या  विद्यार्थ्यांच्या साहाय्याने  १५ दिवस पुरेल एवद्या जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था इंदापूरजवळील पाणसई गावातील आदिवासी कुटुंबाना करण्यात आलेली आहे.

आतापर्यंत आर. डी. नॅशनल कॉलेज बांद्रा च्या एनएसएस युनिट च्या विद्यार्थ्यांमार्फत ६०,०००/- रु. च्या जीवनावश्यक वस्तूंची ६० गरजू कुटुंबाना ह्या जीवनावश्यक वस्तु इंदापूर येथून घेऊन माजी  सरपंच विलास शिंदे यांच्या मार्फत लोकांपर्यंत पोचविण्यात आल्या आहेत. पुढे ही ते अशा गरजू लोकांना आपल्यापरीने मदत करणे चालू ठेवणार आहेत.

याची माहिती आर. डी. नॅशनल कॉलेजचे प्रोफेसर डॉ. विजेंद्र शेखावत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितली. ह्या कॉलेज मार्फत असे अनेक सामाजिक उपक्रम पाणसई गावात राबविले जातात. गेल्या वर्षी आर. डी. नॅशनल कॉलेज मार्फत पाणसई गावात बोर मारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इंदापूर विभागातील ५०० विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले होते.

                       पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या