पोस्को कंपनीकडून मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दोन कोटींंची मदत.

अरुण पवार , प्रतिनिधी

माणगाव : दि १३ - जगभरात कोरोना रोगाने हाहाकार उडवला आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. महाराष्ट्रातही ३० एप्रिल पर्यत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. अनेक संस्था, वैयक्तिक लोक पुढे येऊन आपापल्या परीने मदत करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर माणगांव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी कडून कोरोना ग्रस्तांकरिता मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 2 कोटी रु. ची मदत शिवाय 500  एन 95मास्क, सैनिटायझर, इतर वैद्यकीय उपकरणे देण्यात आली. शिवाय 1000  किराणा व जीवनावश्यक वस्तूंनी भरलेल्या पिशव्यांंचे पाकिटे माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर व तहसीलदार प्रियांका आयरे यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. 

  माणगाव तालुक्यातील भागाड एमआयडीसी मधील पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी स्थानिक समुदायांना त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत त्यांच्या सामाजिक विकासासाठी नेहमी सहकार्य करते. या सर्व वस्तू गरजू व्यक्तीना देण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या साथीतून सर्वांची लवकरात लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना पोस्कोचे व्यवस्थापक श्री. गोखले यांनी पोस्को कंपनीच्या वतीने केली आहे.
   
                           पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Raigad#Mangaon#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या