वैभव सत्वे , प्रतिनिधी
माणगाव : दि. १३ - देशभरात थैमान घातलेल्या कोरोनारुपी वादऴाला समोर जात असताना शासन व प्रशासन विविध लोकोपयोगी निर्णय घेत आहे. महाराष्ट्राचे मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाँकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम केला आहे.
राज्यात व देशात संचारबंदी लागु असताना नियमाचे उल्लंघन करण्यार्या नागरिंकावर व वाहन बंदी असताना अत्यावश्यक कामाखेरीज वाहन चालवण्यार्या नागरीकांच्या मोटारसायकल व चार चाकी वाहने रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव मध्ये मुंबई गोवा हायवेवर जप्त केली जात आहेत माणगांव पोलीसांनी सुमारे 150 ते 200 वाहने जप्त केली आहेत व वाहन चालकांना तसा मेमो देऊन 30 तारखेपर्यंत किंवा प्रशासनाचा पुढील आदेश मिऴेपर्यंत जप्त केली असल्याचे समजते ही कारवाई माणगांव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव वाहतुक पोलीस शाखेकडुन करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश राज्य व केंद्रशासनाचे असल्याचे पोलीस निरीक्षक इंगवले यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुऴे नागरीकांनी आरोग्याची काऴजी घेऊन घरीच राहणे योग्य आहे. असे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी सांगितले आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Raigad#Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या