पोलीस प्रवाह न्युज
मुंबई : दि, १४ - ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली आहे. तसेच कोरोनासारख्या महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला सात गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
१) घरातील ज्येष्ठांची विशेष काळजी घ्या. ज्यांना जुना आजार आहे. त्यांना कोरोनापासून वाचवायचंय.
२) लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग लक्ष्मणरेषा पालन करा. घरात बनवलेल्या फेस कव्हरचा वापर अनिवार्य
३) रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयद्वारे जे निर्देश त्यांचं पालन
४) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अॅप जरूर डाऊनलोड करा. इतरांनाही प्रेरित करा.
५) शक्य तितक्या गरीब कुटुंबीयांची काळजी घ्या. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा.
६) व्यवसाय, उद्योगांत काम करणाऱ्या लोकांसोबत संवेदना... नोकरीवरून काढू नका
७)कोरोना वॉरियर्स डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार यांचा सन्मान करा. आदरपूर्वक गौरव करा.
पोलीस प्रवाह न्यूज
#Narendramodi#pmmodi#modispeech#lockdown #covid19


0 टिप्पण्या