भाजप गोरेगाव शहराध्यक्ष पदी प्रसाद जाधव यांची नियुक्ती

 भाजप गोरेगाव शहराध्यक्ष पदी प्रसाद जाधव यांची नियुक्ती

पोलिस प्रवाह न्युज

गोरेगाव - दि. १२-  आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून माणगांव तालुक्यातील गोरेगाव विभागात भारतीय जनता पार्टीने पक्ष प्रवेशाचा धुमधडाका लावला आहे. तसेच गोरेगाव विभाग पदाधिकाऱ्यांकडून पक्षाची संघटनात्मक मोर्चेबांधणी देखील सुरू झाली आहे. यामध्ये पदाधिकारी पदांमध्ये देखील रचनात्मक फेरबदल करण्यात येत आहे. याच धर्तीवर गोरेगाव मधील सामजिक क्षेत्रात स्वयं पुढाकाराने कार्यरत असणारे नेतृत्व प्रसाद रमाकांत जाधव यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व आ. रवींद्र चव्हाण, राज्यसभा खासदार तसेच दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील  यांच्या मान्यतेने व रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतिश धारप आणि श्रीवर्धन विधानसभा निवडणूक प्रमुख तथा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस  प्रशांत शिंदे  व महाड विधानसभा निवडणूक प्रमुख तथा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस  बिपीन म्हामुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, भाजप माणगांव तालुका अध्यक्ष गोविंद  कासार  यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव शहर अध्यक्ष पदासाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.तसे  नियुक्ती पत्र माणगांव तालुका अध्यक्ष यांनी त्यांना सुपूर्द केले आहे.

यावेळी मा ता उपाध्यक्ष आनंद राजभर, तालुका सरचिटणीस योगेश पालकर, सरचिटणीस जहेंद्र मुंढे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रितेश निवाते, युवा मोर्चा  सरचिटणीस राजेंद्र गाडे, किशोर पवार आदी उपस्थित होते. प्रसाद जाधव यांच्या भाजप गोरेगाव शहराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर सर्व स्तरांतुन त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी मी इमाने इतबारे पार पाडून पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न करेन असे प्रसाद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या