ताम्हिणी घाटात भीषण अपघात
लग्नाला निघालेली बस पलटी; ५ जणांचा मृत्यू तर २५ हून अधिक जखमी
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २०-पुणे दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास बस पलटी होऊन भीषण अपघात झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहीती नुसार पुण्याहून बिरवाडीकडे लग्नासाठी निघालेली खाजगी बस क्र. एम एच १४ जी यु ३४०५ ही पुण्याहून माणगांवकडे येत असताना ताम्हिणी घाटात अवघड वळणावर आल्यावेळी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आले आहे.



0 टिप्पण्या